
मणिपूर सरकारने हिंसाचारग्रस्त राज्यातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तात्काळ प्रभावाने इंटरनेट आणि डेटा सेवांवरील बंदी आणखी पाच दिवसांसाठी वाढवली आहे. मणिपूर सरकारने जारी केलेले नवीन आदेश जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये राज्यातील इंटरनेट सेवा निलंबन पाच दिवसांसाठी म्हणजेच १० जून दुपारी ३ वाजेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
Odisha Train Accident । रेल्वे अपघातात प्राथमिक चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
मणिपूरमध्ये 3 मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (ATSUM) च्या रॅलीनंतर हिंदू मेईते आणि आदिवासी कुकी, जे ख्रिश्चन आहेत, यांच्यात हिंसाचार झाला. गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण राज्यात हिंसाचाराची परिस्थिती असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला निमलष्करी दल तैनात करावे लागले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सोमवारी सकाळी सशस्त्र पुरुषांच्या दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. जिल्ह्यातील कांगचुप भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्मार्टफोन घेताय तर थांबा! ‘असा’ स्मार्टफोन घेतल्यानंतर तुम्हालाही भोगावा लागेल 3 वर्षांचा तुरुंगवास