केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार नेहमी वेगवेगळ्या योजना तर राबवतच असतात. दरम्यान आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली आणि भन्नाट योजना (Scheme) सुरू झाली आहे. या योजनेचं नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) असे आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत फक्त 60 किंवा त्याहून अधिक वयाचे लोकच गुंतवणूक (investment) करू शकतात. या योजनेत तुम्ही 14 लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवू शकता. तसेच या योजनेचा लाभ सेवानिवृत्ती झालेल्या लोकांना जास्त मिळू शकतो. याच कारण म्हणजे सेवानिवृत्तीनंतर लोकांना चांगला निधी मिळतो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुन्हा होणार दिवाळी, कारण कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतय ‘हे’ गिफ्ट
मग हा पैसा अनेक जन घर बांधण्यासाठी किंवा मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच मुलांची लग्न करण्यासाठी वापरतात. इतकंच नाही तर अनेक लोक सेवानिवृत्तीचे हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवतात. दरम्यान आता तुम्ही तुमचा निवृत्तीचा पैसा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला चांगला व्याजदर मिळतो. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये तुमचे खाते सहज उघडू शकता. तसेच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. दरम्यान ती कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) जमा करावी लागतात.
भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळत आहे. या बचत योजनेत तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे काहीवेळा तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी आणखी तीन वर्षांपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. या योजनेत तुम्ही रु. 1,000 रुपयांची सुद्धा गुंतवणूक करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत करू शकता. या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करून 14 लाख रुपयांचा निधी गोळा करायचा असेल. यासाठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. अशा परिस्थितीत मग पाच वर्षानंतर तुम्हाला एकूण 14,28,924 रुपये निधी मिळेल .
विद्यार्थिनीचा संघर्ष! फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; पाहा व्हायरल VIDEO