गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ऋषभ मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर जवळपास एक ते दीड महिना रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. यांनतर मागच्या काही दिवसापूर्वी त्याला रुग्णालयामधून डिचार्ज दिला आणि घरी आराम करण्यास सांगितले.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “..तर अश्लीलता”
दरम्यान, ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी (Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore match) ऋषभ पंत बंगळुरुला आला आहे. माहितीनुसार, दिल्लीपासून 2 हजार किमी लांब असलेल्या चिन्नास्वामी मैदानात पंत पोहोचला आहे.
बैलगाडा शर्यतीला गालबोट! युवकाच्या पोटात बैलानी खूपसले शिंग; तरुणाचा जागीच मृत्यू
या ठिकाणी जाऊन सामना सुरु होण्यापूर्वी ऋषभ पंत ने संघाचे मनोबळ वाढविले आहे. ऋषभ पंत आजारी असून देखील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहचला. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.