IPL Final | आयपीएलच्या फायनल मॅचला पावसाची हजेरी! आता ‘या’ तारखेला होणार सामना

IPL Final | The presence of rain in the final match of IPL! Now the match will be held on 'this' date

यंदाचा आयपीएल सिझन (IPL Season) विविध कारणांमुळे विशेष गाजला. क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी असणाऱ्या यंदाच्या आयपीएल सिझनच्या फायनल सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Gujrat Titans vs Chennai Supar Kings) यांच्यात हा सामना काल होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर हा सामना होणार होता. मात्र काल अचानक आलेल्या पावसामुळे हा सामना कालसाठी रद्द करावा लागला.

बिग ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्सच्या ‘या’ बड्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला…

सुरुवातीला हा सामना थोडा उशिरा सुरू होणार असल्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. मग हा सामना कधी होणार? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. मात्र थोड्या वेळातच आयपीएलच्या ट्विटर हँडल वर आयोजकांकडून या सामन्याबाबतची माहिती देण्यात आली. आयपीएलचा फायनल सामना आज अहमदाबाद मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.

Delhi Police | दिल्ली पोलिसांचे महिला कुस्तीपट्टूंसोबत चुकीचे वर्तन! महिला आयोगाने व्यक्त केला संताप

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणारा फायनल सामना आज संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. यासाठी सात वाजता टॉस होईल. मात्र आजसुद्धा पावसाने हजेरी लावू नये अशी प्रार्थना चाहत्यांकडून करण्यात येत आहे. हा सामना प्रचंड निर्णायक असणार असून यंदाची आयपीएलची ट्रॉफी कोणाकडे जाणार ? याचे उत्तर हा सामना देणार आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत शरद पवार म्हणाले, “मी गेलो नाही याचा मला आनंद आहे…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *