देशात सध्या आयपीएलचे ( IPL) वारे वाहत आहे. आयपीएल ही सर्व क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी असते. त्यातल्या त्यात यंदाचा आयपीएल सिझन विविध कारणांनी गाजत आहे. खेळ म्हंटले की वाद हे आलेच ! याच वादामुळे आयपीएल मधील सोमवारचा (दि.१) सामना खूप गाजला. लखनौ सुपर जाएंट्स ( LSG) विरुद्ध रॉयल चॅलेंजर (RCC) बंगळुरू असा हा सामना होता. या सामन्यात विराट कोहली आणि गौतमी गंभीर यांच्यात वाद होऊन वातावरण तापले होते.
mobile । रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवताय तर सावधान! ‘हे’ आहेत धोके..
महत्त्वाची बाब म्हणजे आधी विराट कोहली (Virat Kohali) आणि लखनौ जाएंट्सचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यात वाद झाला होता. मात्र अचानक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने या वादात उडी घेतली. लखनौ फलंदाजी करत असताना हा वाद झाला. लखनौच्या फलंदाजीवेळी नवीन आणि विराट कोहली यांच्यामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली. मात्र, सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाले.
या सामन्याच्या १७ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज आणि नवीन यांच्यात वाद झाले. यावेळी सिराजने रागात बॉल स्टंपवर मारला. यामुळे हे प्रकरण वाढले. यानंतर विराटने या वादात उडी घेतली आणि वाद अजून चिघळले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये गौतम गंभीर विराटच्या कृतीबद्दल अंपायर सोबत वाद घालत आहे. नंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण सुरू होते. या वादाचा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना खूप मोठा फटका बसला आहे. या दोघांच्या सुद्धा मॅच फी मध्ये १०० टक्के कपात करण्यात येणार आहे.
मुलं मोठी झाली की त्यांच्यासोबत झोपू नये; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण…