Iran Explosion News । सध्या इराणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या केरमन शहरात बुधवारी एकापाठोपाठ एक झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 105 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. (Iran Explosion News)
सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-जमान मशिदीजवळ झालेल्या स्फोटात अन्य १७० लोक जखमी झाले आहेत. केरमनच्या डेप्युटी गव्हर्नर यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ऑनलाइन प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर अनेक मृतदेह दिसत आहेत. स्फोटानंतर इराणचे संरक्षण मंत्री अहमद वाहिदी यांनी या बॉम्बस्फोटांमध्ये इस्रायलचा हात असून त्यांना सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे.
2020 मध्ये इराकमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले जनरल सुलेमानी यांची बुधवारी चौथी पुण्यतिथी होती, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ सोहळा म्हणून बुधवारी शेकडो लोक सुलेमानी यांच्या कबरीकडे जात होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. सुलेमानी यांना इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यानंतर सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पाहिले जात होते.
Sayaji Shinde | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य