Iraq University Fire । इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (8 डिसेंबर) सायंकाळी घडली. सोरानच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, एरबिलच्या पूर्वेला असलेल्या सोरानमधील एका इमारतीत (वसतिगृह) आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! आगीच्या घटनेने पुणे हादरलं! सहा जणांचा होरपळून मृत्यू
स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितले की, शुक्रवारी रात्री आग विझवण्यात आली. रुडाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हा भाग कुर्दिस्तान प्रांतात येतो. कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरूर बरझानी यांनी या घटनेबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे. (Iraq University Fire)
इराकमध्ये आगीच्या घटना सामान्य
इराकमध्ये इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. तेथे अनेकदा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बांधकामे केली जातात. याशिवाय वाहतूक क्षेत्रातही कमालीचा बेफिकीरपणा आहे. इराकमधील सरकारी यंत्रणेची मूलभूत रचना सातत्याने कोलमडत आहे. अनेक दशकांपासून देश भ्रष्टाचाराने त्रस्त आहे. याचे परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.