Irshalwadi Landslide । रायगड : इर्शाळवाडी गावात भयानक घटना घडली. संपूर्ण गावावर दरड कोसळली होती. त्यानंतर तब्बल चार दिवस पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होतं. मात्र आता हे सुरू असलेले शोध कार्य आजपासून थांबवण्यात आल असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दुर्घटनास्थळी कोणत्याही प्रकारची मशीन किंवा वाहने नेता येत नाही त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी कुदळ, फावडे घेऊन या ठिकाणी लोकांना शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र पाऊस चिखल यामुळे या ठिकाणी तेथील लोकांना शोधताना खूप अडथळे येत होते. त्यामुळे हे शोध कार्य थांबवण्यात आले आहे.
या घटनेमध्ये जे लोक बेपत्ता झाले आहेत ते चार दिवसानंतरही सापडले नाहीत. त्यामुळे आता ते कधीच मिळणार नाहीत त्यांच्या फक्त आठवणीत आता राहणार आहेत. ही दुर्घटना एवढी भयानक होती की आतापर्यंत इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 29 वर गेला आहे. मात्र यामधील एक धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेतील 52 जण अजूनही बेपत्ता आहेत तसेच आतापर्यंत 119 जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र आता बचाव कार्य थांबवले असल्याने बेपत्ता झालेली लोक पुन्हा भेटणार नाहीत याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मृतांच्या कुटुंबाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे
“ही घटना खूप दुर्दैवी होती. मात्र या घटनेमध्ये जे काही लोक वाचले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यावर जोर देण्यात येत आहे. या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे”. (Irshalwadi Landslide)
Ajit Pawar | “शरद पवारांनी मला राजकारण शिकवले नाही,” अजितदादांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट
सध्या या दुर्घटनेतील वाचलेल्या लोकांना बसमधून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आलं. त्याचबरोबर, त्यांची ५० कंटेनर मध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे. हे सर्व लोक तीन महिने या ठिकाणी राहणार असून त्यांना तीन महिन्यांचे रेशनही सरकार देणार आहे. मात्र आम्हाला वीज आणि पाणी द्या अशी मागणी या पिडीतांनी केली आहे.
Tomato Price। टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाऊ नका, भाजप मंत्र्याच्या अजब सल्ल्याने खळबळ