अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. शिंदे (Shinde) गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ द्यावी का उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ द्यावी, असा प्रश्न पडत आहे. त्यांच्या या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसत आहे. अशातच आता ठाकरे (Thackeray) गट आणि मनसेच्या (Manase) युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहे. (Latest Marathi News)
नुकतीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांची भेट झाली होती. त्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरून भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. “मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का? सगळ्या गोष्टींचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच्या वहिणींच्या हातातच तर आहे. त्यामुळे युतीचा प्रस्ताव मनसेने सामना कार्यालयातर देण्याऐवजी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर द्यायला हवा होता,” अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आज एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार
दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेची स्थापना केली. अजित पवार यांच्या बंडामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन कार्यकर्ते करत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा युती होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.