देशात एक काळ असाही होता. जेव्हा समाज फक्त नि फक्त अशिक्षित असल्याने मागे पडला होता. तेव्हा, समाजात शिक्षणाची वात पेटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले यांच्यासारखे समाज सुधारक पुढे आले. त्यांनी काळाची आणि समाजाची गरज ओळखून समाजात शिक्षणाचा पाया रचला. त्याच पायावर सुशिक्षित होऊन राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पदावर असलेले चंद्रकांत पाटील सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुख्य म्हणजे ज्यांच्यामुळे ते शिक्षित झाले त्या महापुरुषांबद्दलच बोलताना त्यांची जीभ घसरली आहे.
२१ रागांवरील चित्रपट गीतांचा सुरदरबार रंगला
कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर व जोतिबा फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले न्हवते. त्यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी समाज सुशिक्षित करणाऱ्या महापुरुषांचा अपमान केलाय. थोडक्यात काय तर स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी ( Chandrakant Patil) असे बेताल वक्तव्य करून स्वतःच्या विचारांचे मागासलेपण दाखवले आहे.
“…पण आता रडताना बाथरूम मध्ये नळ सोडून रडते” – मानसी नाईक
मुळात एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी अशी बेताल वक्तव्य शोभतात का ? याआधी भाजपचेच ( BJP) नेते माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे ( Vinod Tawade) यांनी देखील असाच कारणामा केला होता. अमरावती विद्यापीठात एका विद्यार्थ्यांने शिक्षण झाल्यानंतर नोकऱ्याच नाहीत तर आम्हाला नोकऱ्याच नाहीत तर करायचं काय ? असे विचारले असता तावडेंनी थेट लायकी नसेल तर घरी बसा असे वक्तव्य केले होते. यानंतर पुढच्याच निवडणूकीमध्ये तावडेंना साधं तिकीटही मिळालं नाही. शेवटी काय तर देव देतो पण कर्म न्हेत. आपल्या फाटक्या तोंडामुळे तावडेंना जे भोगावं लागलं ते पाटलांच्या पदरी पडायला वेळ लागणार नाही एवढं मात्र नक्की!
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय