
बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता म्हणून ओळख असणारे व नाम फाउंडेशनचे संस्थापक म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) होय. नाना पाटेकर सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. या दरम्यान नुकतीच नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात चर्चेला उधाण आला आहे.
नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत. शुक्रवारी रात्री नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ आणि गणरायाची मूर्ती देऊन स्वागत केले. या भेटीची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे.
दिल्लीच्या पीचवर चेन्नईचा धमाका! ऋतुराजच्या कॅचमुळं वॉर्नरचं शतक हुकलं, पाहा ‘त्या’ कॅचचा Video
नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष बंगल्यावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विकास कामे, नाम फाउंडेशनची सुरू असलेली कार्य, राज्यात सिंचन आणि जलसंधारणाची कामे करण्याची असलेली गरज या विषयांवर चर्चा केली. या दरम्यान नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सदिच्छा भेट कोणती राजकीय रंग समोर आणेल का? हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मल्चिंग पेपरसाठी मिळणार 50 टक्के अनुदान; असा करा अर्ज