थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या संशोधकाचं मत

Is swimming in cold water good or bad? Know the researcher's opinion

नवी दिल्ली | पोहणं हा अनेकांचा आवडीचा छंद आहे. अनेकजण हा व्यायामाचा भाग म्हणून देखील करतात. पोहणे हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांची स्विमिंग पूल,नदी, तलाव यांसारख्या ठिकाणी माणसांची गर्दी पहायला मिळत आहे.

अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार? शिरसाट स्पष्टच बोलले…

अशातच शक्यतो पोहण्याचं पाणी थंड असते त्यामुळे अलिकडेच एक संशोधन करण्यात आलं आहे. यामध्ये संशोधकांनी थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं हे स्पष्ट केलं आहे. तसेच या गोष्टीचा व्यक्तीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का?हेदेखील संशोधकांनी सांगितलं आहे.

ठाकरे गटातील ‘हा’ मोठा नेता शिंदेच्या संपर्कात,संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

UIT द आर्क्टिक युनिव्हर्सिटी आॅफ नाॅर्वे आणि नाॅर्दर्न नाॅर्वे येथील युनिव्हर्सिटी हाॅस्पिटलच्या पुनरावलोकन लेखकांनी त्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. या तज्ज्ञांच्या टीमच्या मते थंड पाण्यात पोहण्याचे अनेक फायदे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तरीदेखील हे त्या व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असल्याचं सांगितलं आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढली, पुन्हा लॉकडाऊन? पाहा काय आहे परिस्थिती

काही लोक पोहण्यात तरबेज असतात. पोहल्यामुळं हृद्य आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीचा देखील व्यायाम होतो. अनेकांना मात्र थंड पाण्याची सवय नसते. त्यामुळे जास्त वेळ थंड पाण्यात राहिल्यानं ह्रदयाची गती वाढते. ह्रदयाची गती वाढल्यानं हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते. असं मत संशोधकांनी नोदंवलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *