
शिंदे गट व ठाकरे गटात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. शिवसेना कुणाची व धनुष्यबाण पक्षचिन्ह कोणाकडे असणार यावर काल निवडणूक आयोगाकडून सुनावणी होणार होती. मात्र काल देखील हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटावर धक्कादायक वक्तव्य केले आहे. निवडणूक आयोग व शिंदे गट यांच्यात साठ गाठ झाली आहे का ? असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.
ब्रेकिंग! पुण्यामधील जुन्या बाजारात भीषण आग
पक्ष प्रमुखच बेकायदेशीर आहे त्यामुळे मान्यता आम्हालाच मिळणार असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोग काय घरचा आहे का? की, निवडणूक आयोगाने ( Election Pannel) शिंदें गटाच्या कानात असे सांगितले आहे ? असे प्रश्न सुषमा अंधारे ( Sushama Andhare) यांनी उपस्थित केले आहेत.
सामनाच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांसह शिंदे-फडणवीस सरकारचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
बीड दौऱ्यावर असताना सुषमा अंधारे यांनी ही वक्तव्ये केली आहेत. तसेच आमची खरी शिवसेना नाही आणि आमचे जिल्हाप्रमुखही खरे नाहीत. आम्हाला आमची खरी वस्तुस्थिती माहिती आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. मात्र शिंदे गटातील हे लोक कॉप्या करुन पास झालेले आहेत. त्यामुळे त्यांना खरे माहिती नाही, असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी लागवला आहे.