कांदा हे मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे रब्बी पीक आहे. खरीप, उन्हाळी व रब्बी अशा तिन्ही हंगामात हे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील बहुतेक भागात हे पीक घेतले जाते. दरम्यान सध्या कांदा (Onion) या पिकावर टाक्या म्हणजेच थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. रब्बी आणि उन्हाळी कांद्यावर हा रोग पसरला आहे. थ्रिप्स (Thrips) या किडीमुळे हा रोग होतो. या रोगामुळे कांद्याचे 50 ते 60 टक्के नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू उमेश यादवची मित्राकडूनच लाखो रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरु
रब्बी व उन्हाळी हंगामातील वातावरण थ्रिप्स किडीसाठी पोषक असते यामुळे या हंगामातील कांद्यांवर हा रोग होतो. ही किड सुरुवातीला छोटी व पिवळसर रंगाची असते. मात्र, नंतर या किडीचा काळपट रंग बनतो.
शिक्षकाकडून विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल
या किडीमुळे कांद्यावर होणारे परिणाम:
1) कांदा पातीवर सुरुवातीला पांढरे डाग तयार होतात यानंतर मग हे डाग पिवळसर पांढरे होतात.
2) कांद्याची पात वाकते.
3) कांद्याची वाढ खुंटते.
4) कांद्याचे वजन घटते.
महिला तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न; सख्ख्या वहिनीनेच रचला कट
टाक्या (थ्रिप्स) किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय
1) कांदा लागवड करण्यपूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिली प्रति लिटर पाण्यात टाकून त्यात बुडवून बिजोपचार करावे.
2) लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी व १५ दिवसांच्या अंतराने फिप्रोनील १ मिली किंवा कार्बोसल्फान २ मिली किंवा प्रोफेनोफोस १ मिली प्रति लिटर पाण्यात टाकून त्याप्रमाणे फवारणी करावी.
3) फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा.
4) बिव्हेरिया बॅसियाना, निम तेल, करंज तेल यासारख्या जैविक किटकनाशकांचा वापर करावा.
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही… “