श्रीलंकेविरुद्ध भारताची टी-20 (India vs Shrilanka T-20) मालिका सध्या सुरू आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी परिवर्तनाची लाट असल्याचे वक्तव्य माजी कर्णधार कपिल देव यांनी केले होते. दरम्यान संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाज चारिथ असलंकाला बाद करण्यासाठी यष्टीरक्षक ईशान किशनने (Ishan Kishan) मागे धाव घेत आणि डायव्हिंग करत झेल घेतला गेला तो क्षण सर्वांच्या अगदी ठळकपणे लक्षात राहिला आहे.
मोठी बातमी! उर्फी जावेद करणार भाजपमध्ये प्रवेश?
यावेळी असलंकाने उमरानच्या एका लेन्थ बॉलचा शॉर्ट खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त टॉप एज लागून हवेत उंच गेला. दरम्यान चेंडू फाइन लेग बाऊंड्रीकडे उडाला, मात्र विकेट कीपिंग करणार्या इशान किशनने वाऱ्यासारखा त्याचा पाठलाग केला आणि चपळतेने तो पकडला. हा झेल पाहून फक्त प्रेक्षकच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) सुद्धा आश्चर्यचकित झाला होता.
करीना कपूर मराठीत बोलते तेव्हा…! ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच
वानखेडे स्टेडियममध्ये हजारो लोकांनी ईशान किशन च्या जबरदस्त कामगिरीच्या क्षणाचा जल्लोष केला. विशेष म्हणजे भारताने हा सामना जिंकला आहे. विजयाचा नारळ फुटल्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये ईशान किशनने त्याच्या पराक्रमाचे गुपित उघड केले आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या प्रशिक्षणादरम्यान उंच झेल घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते. या सामन्यातील इशान किशनने पकडलेल्या झेलची फिल्डिंग कोच यांनी कौतुक केले आहे.