Rohit Pawar । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करून भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाला शरद पवार (Sharad Pawar) गटापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. अशातच आता अजित पवार गटाकडून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा केला जात आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. (Latest Marathi News)
रोहित पवार म्हणाले, “मी अजित पवार यांचा पुतण्या असल्याने जर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंद होईल. परंतु, सामान्य नागरिक म्हणून माझ्या मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्रीपदावर राहिले असते. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये भांडण लावून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra Rain | पावसाचे थैमान सुरूच! अंगावर वीज कोसळून तिघांचा बळी
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी देखील काल अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. यावर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असून त्यांच्या नेतृत्वात काम सुरु असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
हे ही पहा