Israel-Hamas War । धक्कादायक बातमी! गाझा रुग्णालयावर इस्रायलचा हवाई हल्ला, 500 हून अधिक लोक ठार

Israel-Hamas War

Israel-Hamas War । इस्रायल-हमास युद्धादरम्यान गाझामध्ये इस्रायलची कारवाई सुरूच आहे. यामध्येच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्रायलने गाझा सिटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Viral Video । लाइव्ह रिपोर्टिंग करताना मुले त्रास देत होती, महिला रिपोर्टरने मारली कानाखाली, पाहा व्हिडिओ

हवाई हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू

गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायलने गाझा सिटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात 500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. या हवाई हल्ल्याच्या वेळी शेकडो लोक आश्रय घेण्यासाठी अल-अहली रुग्णालयात पोहोचले होते.

World Cup 2023 । पावसामुळे बीसीसीआयच पितळ उघड, पहा धक्कादायक व्हिडीओ!

इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले तीव्र केले आहेत. मंगळवारी संध्याकाळी गाझा येथील हॉस्पिटलवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 500 लोक ठार झाल्याची माहिती आहे. या रुग्णालयात शेकडो लोक आश्रय घेत होते, असा हमासचा दावा आहे. हमासच्या दाव्यावर इस्रायलने या बातमीची चौकशी करत असल्याचं म्हटलं आहे.

Gas Cylinder । मोठी बातमी! फक्त 400 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ‘या’ पक्षाने केली मोठी घोषणा

त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेवर पोस्ट टाकली. ते म्हणाले की, सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून असे सूचित होते की, गाझाच्या अल अहली रुग्णालयावरील अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणासाठी इस्लामिक जिहाद संघटना जबाबदार आहे. ते पुढे म्हणाले की, गाझा येथील रुग्णालयावर कोणी हल्ला केला हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. यामागे रानटी दहशतवादी होते, आयडीएफचा नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली त्यांनी स्वतःच्या मुलांचीही हत्या केली.

Viral Video । भर रस्त्यात गाडीच्या छतावर बसून कपलने केला रोमान्स; व्हिडीओ व्हायरल, नागरिक म्हणाले…

Spread the love