Israel Hamas War Update । इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध तीव्र होत आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्स (UN) ने म्हटले आहे की गाझा पट्टीतील 423,000 हून अधिक लोकांना आता त्यांची घरे सोडून पळून जावे लागले आहे, कारण इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर बॉम्बफेक सुरू ठेवली आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
एएफपीच्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र मानवतावादी एजन्सी ओसीएचएने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गाझामधील विस्थापित लोकांची संख्या 84,444 ने वाढून 423,378 झाली आहे. (Israel Hamas War Update)
पीएसआयने Dream 11वर जिंकले दीड कोटी रुपये, त्यानंतर चर्चेत आला मात्र आता…
युद्धात आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 1,300 हून अधिक इस्रायली ठार झाले असून त्यात नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे. त्याच वेळी, 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्येही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 1500 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. (Gaza Strip)
हमासने 150 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले
हल्ल्यानंतर हमासने 150 हून अधिक इस्रायली लोकांना आणि काही परदेशी लोकांना ओलिस बनवून गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलने केलेल्या प्रत्येक हवाई हल्ल्याचा बदला म्हणून हमासने प्रत्येक ओलीस ठार मारण्याची धमकी दिली.
Mia Khalifa । पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे मिया खलिफाला पडले महागात! नोकरीवरुन केली हकालपट्टी