Israel Hamas War Update । जीवन नरक बनले! इस्रायलच्या हल्ल्यात १७ दिवसांच्या मुलीचा गेला जीव

Israel Hamas War Update

Israel Hamas War Update । इस्रायली सैन्य आता गाझाप्रमाणे बॉम्बने हमासची जागा उद्ध्वस्त करत आहे. पश्चिम किनाऱ्यात अनेक इमारती पाडण्यात आल्या आहेत. हमासचे जास्तीत जास्त नुकसान लवकरात लवकर करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. हमासचे ते छुपे ठिकाण शोधण्याचाही प्रयत्न आहे जिथे हमासचे वरिष्ठ नेते लपले असतील. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जन्मानंतर अवघ्या 17 दिवसांतच इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

Pune Korean Blogger News । मोठी बातमी! लाइव्ह व्हिडिओमध्ये कोरियन ब्लॉगरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

दक्षिण गाझा शहरातील एका इस्पितळात जिथे वीजही नव्हती तिथे युद्धादरम्यान तिचा जन्म झाला असे म्हटले जाते. या भागात रोज बोंबाबोंब होत आहे. तिच्या कुटुंबाने मुलीचे नाव अल-अमिरा आयशा म्हणजेच “राजकुमारी आयशा” ठेवले होते, जी आता या जगात नाही. या युद्धाने तिला पृथ्वीवरील तिसरा आठवडाही पूर्ण करू दिला नाही. (Israel Hamas War Update)

Accident News । धक्कादायक! दारूच्या नशेत होत्याच नव्हतं झालं, रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत तीन जण ठार

हल्ल्यात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले

या स्फोटात वाचलेल्या मुलीची आजी सुझान झोराब म्हणाली की, या हल्ल्यात राफाहमधील तिची अपार्टमेंट इमारत उद्ध्वस्त झाली. हल्ला झाला तेव्हा त्यांचे कुटुंबीय झोपले होते. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमीरा आणि तिचा 2 वर्षांचा भाऊ अहमद यांच्यासह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

Spread the love