पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) 18 वे जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. आताची राजकीय परिस्थिती लयाला गेली आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी महापुरुषांना खेचलं जातंय. सध्या कोणीही काहीही बोलत आहे. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
भीमा पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरा दिवसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
महाराष्ट्रातील एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मात्र, आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना शोभत नाही असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आफताबला वाजून आलीये थंडी पण कपडे घेण्यासाठी नाहीत पैसे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याराज्यांत कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक राज्याकडे समान पाहिले पाहिजे. फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. राजकारणामध्ये एखाद्या भूमिकेला विरोध करणे चुकीचे नाही. जर चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही केले पाहिजे असे देखील राज ठाकरे म्हणाले.