
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sinh Koshyari) काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात होती. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आपले भावी आयुष्य वाचन व लेखनात घालवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे.
ब्रेकिंग! पोलिसांची बोट भरसमुद्रात बुडाली
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून मोजक्या शब्दात टीका करताना शरद पवार म्हणाले, राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. त्याचबरोबर नवीन राज्यपाल कोण येणार यावर शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, नवीन राज्यपाल कोण येणार हे माहिती नाही मात्र आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“…तर पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यांनतर नवीन राज्यपाल कोण असतील? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामधेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर राज्यपालपदासाठी सुमित्रा महाजन यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र हे दोन नाव चर्चेत असली तरीदेखील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वनपथकाने चांगलीच जिरवली धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची मस्ती; 5 हजारांचा दंडही केला वसूल
दरम्यान, मधल्या काळात भगतसिंग कोश्यारी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत होते. त्यामुळे भाजपा समोरील आव्हाने देखील वाढत होती. आता त्या आव्हानांच्याच पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जाणार? परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा