मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होत.दरम्यान शिक्षक संघटना प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून प्रशांत बंब यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात पाच सप्टेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक रस्त्यावर येणार आहेत.
झारखंडच्या राज्यपालांकडून JMM शिष्टमंडळाने मागितली भेटीची वेळ, 4 वाजता होणार भेट
आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत
पुढे प्रशांत बंब म्हणाले की “महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ२० वर्षांपूर्वीच बंद केले पाहिजेत होते पण आत्ता हे बंद करा.तसेच दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत, याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात.ते आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत ठरतील अस देखील प्रशांत बंब म्हणाले.
मग तुम्हाला खोटी कागदपत्र लावण्याचं काय कारण? –
आमदार प्रशांत बंब म्हणाले, “मी जे बोललो त्याविरोधात आंदोलन करणं, म्हणजेच माझं बोलणं किती खरं आहे आणि किती यांना लागलेलं आहे, असं दिसतं. शिक्षकांकडून खोटी कागदपत्र तयार करणं हा गुन्हा नाही का? आजपर्यंत गावात हे शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदार संघातील जे शिक्षक आहेत, ते यांच्या पाठबळामुळे हे वरपर्यंत चालले आहेत. जनतेने जर थोडा जरी आवाज उचलला आणि आमच्या गावात तुम्ही का येत नाही असं विचारलं तर लगेच त्यांच्यावर ३५३ कलम लावणार. विविध गुन्हे लावणार, अब्रनुकसानीचे गुन्हे नोंदवणार. म्हणजे कोणाला बोलूच द्यायचं नाही. हे सगळं या शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांमुळे होत आहे. हे सगंळ आपल्याला बंद करावं लागेल.”
Abdul Sattar: कृषिमंत्री सत्तार मेळघाट दौऱ्यावर असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, कारण…
आमच्या पिढ्या बरबाद नाही झाल्या पाहिजे –
तसेच, “आधी विधानभवनात ३ टक्के सुशिक्षित लोक असायचे.म्हणून शिक्षक आणि पदवीधऱ मतदारसंघ निर्माण झालेले आहेत. आता सगळेच आम्ही सुशिक्षित आहोत. प्रत्येक पालक तिथे येऊन विरोध करू शकत नाही.शिक्षक लोक अवैध संघटना चालवतात, त्यांना हे पाठबळ देतात, त्यांच्या संघटनांमध्ये हजर राहतात. म्हणजेच तुम्ही शिक्षणाचं बाजारीकरण करणार का? आमच्या पिढ्या बरबाद नाही झाल्या पाहिजे.” असंही प्रशांत बंब म्हणाले.
खुशखबर! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवीन दर
याआधी देखील वैजापुरमध्ये काही शिक्षक संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये शिक्षक संघटनांशी संबंधित ६०० ते ७०० शिक्षक सहभागी झाले होते. या संदर्भाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले होते.