मुंबई : आपण सर्वजण गुगलचा (Google) वापर करतो. आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी सर्च करण्यासाठी आपण गुगलचा वापर करत असतो. पण गुगल सर्च देखील महागात पडू शकत असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत (Mumbai) समोर आला आहे.
मुंबईमधील एका महिलेने फूड डिलीव्हरी अॅपवरून (Food Delivery App) एक ऑर्डर प्लेस केला होता. पण याचं पेमेंट बऱ्याचदा करून देखील होत नव्हतं शेवटी त्या महिलेले संतापून गूगलवरून संबंधित दुकानाचा नंबर काढून पेमेंटसाठी कॉल केला.
मोठी बातमी! कारखान्याचे धुराडे सुरू, पहिली उचल ३१००
नंतर घडलं असं की, दुकानदाराने त्या महिलेला क्रेडिट कार्डच्या (credit card) डिटेल्स मागितल्या असून ओटीपी शेअर करण्यास सांगितला. ओटीपी शेअर करताच दुकानदाराने महिलेच्या अकाऊंटमधून जवळपास दोन लाख चाळीस हजार गायब केले. संबंधित बाब महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसात तक्रार केली आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
बाबो! ‘हा’ बाहुबली समोसा खा अन् मिळवा 51 हजारांच पारितोषिक; वाचा नेमकं काय आहे प्रकरण