Maratha Reservation । मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं अशक्य! भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Maratha Reservation

Maratha Reservation । मुंबई : मागील काही दिवसांपासून आरक्षणासाठी (Reservation) मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा मराठ्यांनी घेतला आहे. आरक्षणावरून राज्याचे राजकारण देखील बदलले आहे. अशातच आता भाजपच्या (BJP) बड्या वक्तव्याने मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Parliament Winter Session 2023 । संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लावून धरली असून याच मागणीवरुन भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपण तर कुणबी म्हणून आरक्षण कधीच घेणार नाही अशी भूमिका एका पत्रकार परिषदेत घेतली होती. अशातच आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं जमणार नाही अशी भूमिका मांडली आहे. (Maharashtra politics)

Accident News । भीषण अपघात! आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखीत घुसला भरधाव कंटेनर, तिघांचा मृत्यू तर १० वारकरी गंभीर जखमी

त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका मांडली जात आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून सरसकट आरक्षण देता येणार नाही असे ठरवले आहे.कोर्टाने आधी आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली असून समाजाला नक्की न्याय मिळेल असे गिरीश महाजन म्हणाले आहे.

Viral Video । चालत्या ट्रेनमध्ये सिंदूर भरले, मंगळसूत्र घातले; जोडप्याच्या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

Spread the love