रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांचा सोमवारी (दि.6) अपघात झाला होता. या अपघातात (Accident) ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान काल पहाटे कोल्हापूर (Kolhapur) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिफायनरी समर्थकांविरोधात बातमी दिल्याने हा अपघात घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
“…अन् शेतकरी आजोबांनी इंग्रजी मधून बोलायला सुरुवात केली”, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
शनिवारी दुपारी शशिकांत वारीशे हे मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. यावेळी राजापूर येथे पेट्रोल पंपाजवळ एका एसयुव्हीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच स्थानिकांच्या मदतीने वारीशे यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
शिवसेना आक्रमक! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात जेलभरो आंदोलन
वारीशे यांनी राजापूर रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात स्थानिक वृत्तपत्रात एक वृत्त प्रकाशित केले होते. ‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो’ असे यामध्ये लिहिले होते. यानंतर वारीशे यांनी ही बातमी सोशल मीडियावर देखील शेअर केली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
“मी तुम्हाला करते मुजरा”, गौतमी पाटीलच नवीन गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर!
शशिकांत वारीशे यांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. वारीशे यांच्या मेहुण्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर गाडीचालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याला अटक करण्यात आली आहे.