लावणी कलाकार गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या लावणी करण्याच्या शैलीवरून तिला ट्रोल केले जात आहे. महिन्यांपूर्वी गौतमीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आणि त्यानंतर तिच्याच कार्यक्रमादरम्याम एका तरुणाचा झालेला मृत्यू, यामुळे गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अजूनही तिच्यावर टीका करणे सुरूच आहे.
शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पठाण चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित
लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते’ असा गंभीर आरोप तिच्यावर केला जातोय. दरम्यान, चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. याची माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी गौतमी पाटीलवर जोरदार टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; जाणून घ्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?
यावेळी सुरेखा पुणेकर म्हणाल्या, आजच्या तरुण कलावंतांनी लावणी चांगली शिकून समजून घेतली पाहिजे. जर कोणी माझ्याकडे आल्यास त्यांना मी लावणी शिकवू शकते. कलावंत तरुणींनी अंगभर कपडे घालून लावणीमधून कला सादर करावी. मात्र, काही कलावंत तसे करताना दिसत नाही. मात्र, आपण लावणीची विटंबना होऊ देणार नाही असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
झोपलेल्या व्यक्तीजवळ जाऊन बसले तीन चित्ते अन् पुढे घडल असं की, पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा Video