
Maratha Reservation । बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हे अंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसींमधून (OBC) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)
बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “खरंतर ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, त्यांना आरक्षण देण्याविषयी सर्वांची मागणी होती. त्यांच्या आरक्षणाला आमचं देखील समर्थन आहे. परंतु असे कोण म्हणाले की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या? संविधानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य नाही. या समाजाला आरक्षण पाहिजे जे न्यायालयात टिकेल ते दिले पाहिजे”, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
“आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेनं लढा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की, आरक्षणासाठी स्वतःचा जीव द्यायाचा विचार करु नका. कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे संवैधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागणार आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
Health Tips । सावधान! चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका फ्रीजमध्ये, द्याल कॅन्सरला आमंत्रण