“Devendra Fadnavis: “…ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे..”, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

"...It is the last election of our life..", Fadnavis explained to the question of the journalists

मुंबई : आज नागपूरमध्ये (Nagpur) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस (Fadanvis) यांनी शिंदे गट आणि भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भातील प्रश्नावर भाष्य केलं आहे. काल सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी मुंबईतील भाजपाचे (Bjp) खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढण्याचे आवाहन केलं.

Suresh Raina: सुरेश रैनाने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कारण…

पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की,“कुठलीही निवडणूक लढत असताना ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असा विचार करुन तुम्ही स्वत:ला झोकून देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महानगरपालिकेसंदर्भात नव्हतं तर एकूणच निवडणुकीच्या नियोजनाबद्दल होतं,” असं फडणवीस म्हणाले.

Salman Khan: सलमानच्या ‘या’ बहुप्रतिक्षीत चित्रपटातील हटके लूक आला समोर; पाहा VIDEO

फडणवीस यांना पत्रकारांनी शिंदे गट, भाजपाच्या आणि मनसेसोबत युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, भाजपा आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट, आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *