
आजकाल भरपूर लोकांना ‘रॅप’ ऐकायला आवडते. सोशल मीडियावर सतत नवीन रॅप चा ट्रेंड येत असतो. दरम्यान मध्यंतरी एका रॅपरने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला होता. छत्रपती संभाजीनगर मधील राज मुंगासे ( Raj Mungase) असे या रॅपरचे नाव आहे. राजचे रॅप सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर, यावर थेट राजकीय वर्तुळात देखील चर्चा झाली होती. यानंतर रॅपमधून राजकीय टिपण्णी केल्याच्या आरोपाखाली राज मुंगासेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
राजला सोडवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने राजच्या भावाने राजकीय नेत्यांची मदत घेत आपल्या भावासाठी भावनिक साद घातली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांना मेसेज करून राजच्या भावाने राज बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून त्यामध्ये सरकारला राज मुंगासेचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
मोठी बातमी! अजित पवार भाजपात जाणार? ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पोलिसांनी अटक केल्यापासून राज मुंगासे बेपत्ता आहे. संभाजीनगरमधील पोलिस राजला मुंबईमध्ये अटक केले असल्याचे सांगत आहेत. तर, मुंबईमधील पोलीस राज स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये असल्याचे सांगत आहेत. यामुळे गोंधळात अडकलेल्या कुटुंबियांनी आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) यांची मदत घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सरकारला सुनावले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असल्याचे म्हंटले आहे.
अजित पवार घेणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या चर्चा