A young woman died after falling from the seventh floor : आजकालची तरुण मुलं पार्ट्या करण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशन्सला आपला जीव धोक्यात घालून जातात. ती कधी उंच डोंगरांवरती जातात तर कधी ती नको त्या ठिकाणी जातात. मात्र अशा काही पार्ट्यांमुळे बऱ्याचदा जीव देखील गमवावा लागतो. सध्या मुंबईमध्ये (Mumbai) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
खळबळजनक! शरद पवारांनंतर आता संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी
मुंबईमध्ये एक तरुणी तिच्या दोन मित्रांबरोबर पडीक इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती आणि तीच पार्टी तिची शेवटची पार्टी ठरली. त्या तरुणीला अंधार असल्यामुळे पुढचा अंदाज आला नाही आणि तिचा तोल गेला व ती सातव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत तिच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. व त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्या दोन तरुणांपैकी एक तरुण त्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे तर दुसरा तरुण तिचा जस्ट फ्रेंड आहे. खरंच ती तरुणी तोल जाऊन पडली का तिला पाडले गेले याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.