Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवार यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका

It was Sharad Pawar who incited farmers to commit suicide, strongly criticized by Chandrasekhar Bawankule

मागच्या काही दिवसापासून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा खूप चिंतेत आहे. कांद्याबरोबरच केळीचे देखील नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच वाद झालेले पाहायला मिळतायेत. दरम्यान आता याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे.

दहावीच्या पेपरला शिक्षकांनी लिहिली थेट फळ्यावर उत्तरे! सामूहिक कॉपीचा गैरप्रकार उघडकीस

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, शिंदे- फडणवीस (Shinde- Fadnavis) सरकारने कांदा उत्पादकांना नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती होती त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कोणीच दखल घेतली नव्हती. असे बावनकुळे म्हणाले आहेत.

“अधिवेशन संपले की हे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणार “, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, शरद पवारांना आधीचे दिवस आठवत नसतील मात्र त्यांनीच शेतकऱ्यांचे हाल केले. आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली.

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणात पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Spread the love
Exit mobile version