Pune Crime । संतापजनक! घरच्यांनीच महिलेची साडी चोरून केला जादूटोणा

It was the family members who stole the woman's saree and performed witchcraft

Pune Crime । पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra) कितीही जनजागृती केली तरी अंधश्रद्धा (Superstition) कमी होत नाही. जादूटोण्यातून अनेकांचा बळीही जातो. याविषयी कायदे कडक केले तरी यातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत. 21 व्या शतकातही जादूटोणासारखे (Blackmagic) संतापजनक प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित लोकही याला बळी पडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Crime News)

Govinda । गोविंदानं सांगितलं चित्रपटांमध्ये काम न करण्यामागच कारण, म्हणाला; “स्वत:लाच कानाखाली..”

मिळालेली माहिती अशी की, प्रॉपर्टीच्या कारणावरून सावत्र आई, भाऊ, आजी, मामा आणि चुलत बहीण यांनी घरातील महिलेची साडी चोरून साडीच्या बाजुला प्राण्याचे काळीज, मटण, अंडी टाचण्या लावलेले लिंबू, भात, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणीसाठी जादूटोणा केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime News) घडली आहे. याप्रकरणी अनिकेत सुपेकर यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. (Crime News)

Crime News । भयानक! असं काय घडलं की पोलिसानं स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुरड्याला आपटलं रस्त्यावर

प्रॉपर्टीच्या कारणावरून महिलेच्या आईच्या साडीची चोरी करून हा प्रकार करण्यात आला. कोथरूड तसेच जनवाडी येथे या प्रकार घडला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. परंतु या घटनेनंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे.

Women Reservation Bill 2023 । मोठी बातमी! आज होणार महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा

Spread the love