मुंबई : शिवसेनेचे 40पेक्षा जास्त आमदार बंड पुकारून भाजपच्या संपर्कात आले. दरम्यान आता शिवसेनेनंतर काँग्रेसचेही नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात आले असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच आता काँग्रेसपक्षात फुट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. दरम्यान यावर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. याला उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.” आदित्य ठाकरे शुक्रवारी (२ सप्टेंबर) मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आले असताना ते बोलत होते.
Indian Navy: भारतीय नौदलाकडून शिवरायांचा गौरव; राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन केलं नव्या चिन्हाच अनावरण
पुढे आदित्य ठाकरे यांना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही.”
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, पाहा PHOTO
गणेशोत्सवातील राजकारणावर म्हणाले, “कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा. आणि जर जो कुणी उत्सवाच्या काळात राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. आणि जर उत्सवात राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. .”