Site icon e लोकहित | Marathi News

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही! राज ठाकरेंचे मोठे विधान…

It will not take long to ruin Pune! Raj Thackeray's Big Statement...

पुणे येथे सुरू असणाऱ्या सहजीवन व्याख्यानमालेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पुण्याच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे. मुंबईची बरबादी व्हायला काही काळ गेला. परंतु, पुण्याची बरबादी व्हायला वेळ लागणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. पुण्याचे वाढते स्वरूप आणि बदलती जीवनशैली या विषयावर ते व्याख्यानमालेत बोलत होते. ‘नवं काही’ असा या व्याख्यानमालेचा विषय होता.

जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय!

पुण्यात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. 1995 च्या आधीच्या पुण्यात ( Pune) आणि त्यानंतरच्या पुण्यात भरपूर बदल झाले आहे. त्याकाळात नदी पलीकडचे पुणे आणि नदी अलीकडचे पुणे असे पुण्याचे दोन भाग होते. मात्र आता दिवसेंदिवस पुणे वाढत आहे. अनेक गावे पुण्यात समाविष्ठ झाली आहेत. यामुळे पुण्याचे चित्र पालटले आहे. सध्या पुण्याचा पसारा हिंजवडी, महाळुंगेपासून मगरपट्टापर्यंत पसरला आहे.

शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र

यामुळेच राज ठाकरे मागील अनेक भाषणांमध्ये सांगत आले आहेत की,” मुंबई (Mumbai) बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही.” दरम्यान अमिताभ बच्चन जर त्यांच्या शहरातून मुंबईत आले नसते तर आज त्यांची ओळख कुणाला नसती. त्यांनादेखील महाराष्ट्रानं खरी ओळख दिली आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी बिहार आणि गुजरात मधील लोकांना महाराष्ट्रातील लोकांनी मोठं केलं आहे. अशी माहिती दिली. तसेच सध्या विधानसभेतील एकही भाषण ऐकायची इच्छा उरली नाही. असे देखील या व्याख्यानात ते म्हणाले आहेत.

मोठी बातमी! भीमा पाटसचे फक्त 8 दिवसात 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप

Spread the love
Exit mobile version