Sanjay Raut । “शिवसेना आणि राष्ट्रवादीला संपवणे हे संघाचे षडयंत्र”, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut

Sanjay Raut । नाशिक : सत्तेत बदल झाल्यापासून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सतत सामोरे जावे लागते. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) संपवणे हे संघाचे षडयंत्र आहे,” असा खळबळजनक आरोप केला आहे. यावरून नवीन वादाला तोंड फुटू शकते. (Latest Marathi News)

Mahad News । मुलगा झाल्याचा आनंद आला अंगलट! मित्रांसोबत पोहायला गेला अन् झालं असं काही की…

संजय राऊत हे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) बदनामीप्रकरणी दाखल खटल्यात दोन वेळा गैरहजर राहिले होते. ते शनिवारी मालेगाव येथील न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ” भाजप काही लोकांना हाताशी धरत आमचे पक्ष, नेतृत्व संपवण्यासाठी चारित्र्यहनन करत असून त्यातून त्यांच्या हाती काहीच लागणार नाही,” असे राऊत म्हणाले आहेत.

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठं खिंडार! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा

पुढे ते म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे ज्या तुरुंगाच्या कोठडीत आहेत, त्याच कोठडीत सध्याचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना २०२४ च्या निवडणुकीनंतर ठेवण्यात येईल,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Rajesh Tope । कारवर हल्ला झाल्यानंतर राजेश टोपे यांनी दिली पहिली प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्या कारचे.. .”

Spread the love