शेजारी म्हटलं की भांडण तिरस्कार या सर्व गोष्टी आल्याच. मग हे भांडण कितीही छोट असो किंवा मोठ असो यासाठी कोणतेही कारण लागत नाही. असांच एक प्रकार उत्तरप्रदेशमधील ( Uttar Pradesh ) आझमगडमध्ये घडला आहे. गुड्डू आणि सुरेंद्र यांच्यामधील हे भांडण अंडरवेअरसाठी झालं. किती शुल्लक कारणावरून हे भांडण झालं असं वाटतंय ना! परंतु हे भांडण सर्वांना चांगलंच महागात पडलं या भांडणामध्ये आठ जण जखमी झाले असून सगळ्यांना रुग्णालयात दाखल केल आहे.
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, अवघ्या काही तासातच लागणार 12वीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
माहितीनुसार, सुरेंद्र आणि गुड्डू यांच्यामधील अंडरवेअरचा किरकोळ वाद एवढा वाढला की दोघांची हाणामारी सुरू झाली. सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीवर काठीने गुड्डूने वार केले. सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की गुड्डू हा नेहमीच गुंडागिरी ( hooliganism ) करत असतो. व जुने भांडणे उकरूण काढून नेहमीच हाणामार करत असतो. परंतु हा जो वाद झाला तो अंडरवेअर वाळवण्यावरून झाला. घराशेजारील ठिकाणी अंडरवेअर का वाळवतोस यावर गुड्डू ने सुरेंद्रला धमकाविले. त्यानंतर दोन्हीही कुटुंबामध्ये भांडण सुरू झाली.
काठ्या आणि विटांनी मारहाण झाली. या भांडणामध्ये बरेच जण जखमी झाले. मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कोणतेही कारवाई केली नाही. जखमी लोक रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुरेंद्र आणि गुड्डू यांच्यामधील काही वैयक्तिक वाद ( personal dispute ) असल्याचं सांगितलं जातंय.
Emergency Call | इमर्जन्सी कॉल कसा कनेक्ट होतो माहिती आहे का ? जाणून घ्या अधिक…