Site icon e लोकहित | Marathi News

ऐकावं ते नवलच! मेकअप आवडला नाही म्हणून नवरीने केली पोलिसांत तक्रार

It's amazing to hear! The wife complained to the police because she did not like the makeup

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. यावेळी सर्वांनाच सुंदर दिसावे असे वाटते. विशेषतः मुलींना ! यासाठी मुली लग्नात भरपूर प्रमाणात पैसे देखील खर्च करतात. मध्यप्रदेश मध्ये अशाच एका मुलीने लग्नातील मेकअप साठी पैसा खर्च केला होता. परंतु, ब्युटिशियनने केलेला मेकअप न आवडल्याने तिने पोलिसांत तक्रार केली आहे. लग्नाच्या दिवशी थेट पोलीस ठाण्यात जाणाऱ्या या नववधूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

“मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही” – भगतसिंह कोश्यारी

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील ही नववधू ( Bride) आहे. लग्नाच्या दिवशी ही नववधू मेकअप साठी एका ब्युटी पार्लर मध्ये गेली. मात्र याठिकाणी ब्युटिशियनने नववधुचा खास मेकअप केला नाही. त्यामुळे तिने केलेला मेकअप नववधूला आवडला नाही. यावेळी नववधूने ब्युटी पार्लरच्या (Beauty Parlor) मालकीणीकडे तक्रार केली. पण उलट ब्युटी पार्लरच्या मालकीणीनेच नव्या नवरीला शिवीगाळ केली. याकारणाने नववधुने रागात जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

युवा शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकर पपईतून घेतले २३ लाखाचं भरघोस उत्पन्न; वाचा सविस्तर

एवढंच नाही तर ब्युटी पार्लरच्या मालकीणीने नववधूला शिवीगाळ करताना जातीवाचक शब्द वापरल्याने हे प्रकरण आणखी चिघळले आहे. ही नववधू सेन समाजातील असून या घटनेची माहिती मिळताच सेन समाजातील वेलफेअर असोसिएशनने ( Sen Welfare Association) देखील तिला पाठिंबा दिला आहे. लग्नाच्या दिवशीच पोलिसांत जाऊन तक्रार करून गोंधळ उडवून देणारी ही नववधू सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे.

सलमान खान ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात? चर्चाना उधाण

Spread the love
Exit mobile version