आपण सगळेच आता ऑनलाइन जमान्यात राहत आहोत. वेळेची, पैशाची आणि कष्टाची बचत म्हणून ऑनलाईन खरेदीवर लोकांचा आजकाल अधिक भर असतो. अंगातल्या कपड्यापासून ताटातल्या घासापर्यत सगळ्या गोष्टी सहज ऑनलाइन उपलब्ध होतात. स्विगी Swiggy, झोमॅटो ( zomato) या ऑनलाइन अन्नपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या प्रसिध्द कंपन्या आहेत. यामधील स्विगीने 2022 मध्ये सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे.
धक्कादायक! बारामती मध्ये कोयते आणि तलवार वापरून राडा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भारतीयांनी स्विगी वरून कोणते पदार्थ ऑर्डर केले याबाबत कंपनी दरवर्षी माहिती देत असते. यंदा देण्यात आलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये भारतीयांमध्ये बिर्याणीच सर्वाधिक पसंतीची ठरली आहे. या वर्षात भारतीयांनी मोठ्या प्रमाणात बिर्याणी ऑर्डर केली आहे. मागील 7 वर्षांपासून या यादीत बिर्याणीच टॉपला असल्याची माहिती स्विगीने दिली आहे.
चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीचा धसका घेतला? सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना केला फेसशिल्डचा वापर!
स्विगी च्या सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीत मसाला डोसा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या स्थानावर बटर नान आहे. तसेच चौथ्या स्थानावर चिकन फ्राइड राइसने बाजी मारली आहे. याव्यतिरिक्त कोरियन आणि इटालियन खाद्यपदार्थांवर देखील यंदा भारतीयांनी ताव मारला आहे. 2022 च्या टॉप ऑर्डरमध्ये इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल या पदार्थांचा देखील समावेश आहे.
“…अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल”; महाविकास आघाडीच्या महामोर्चात शरद पवार कडाडले