Politics News | राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार आल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या सरकारवर (Government) विरोधक टीका करत आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. (Latest Marathi News)
परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे राज्य सरकारवर (State Govt) विरोधकांनी निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु अजूनही या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
Dragon Fruit Farming । शेतकरी बांधवांनो, ड्रॅगन फ्रुट लागवड करून मिळवा सरकारी अनुदान
“अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी 10 हजार रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्र्यांनी केली होती. परंतु, अजून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले नाहीत. त्यांना कोणतीही मदत केली नाही. हे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे,” अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.