Site icon e लोकहित | Marathi News

Weather Update । पुन्हा पावसाचे थैमान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

It's raining again! Meteorological department has warned of heavy rain

Weather Update । नवी दिल्ली : राज्यात यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) पाऊस लांबणीवर पडला होता. या वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली होती. परंतु, या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके जळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

तुमच्या गावात कोणी जमीन खरेदी केली आणि कोणी विकली? एका मिनिटात समजणार, जाणून घ्या कसं ते?

राज्यात जरी पावसाने दडी मारली असली तरी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून या राज्यात 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी (IMD Alert) करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Heavy Rain)

Bus Accident । भाविकांवर काळाचा घाला! 50 फूट खोल दरीत बस कोसळून 7 भाविकांचा जागीच मृत्यू

या दोन्ही राज्यांमध्ये 250 पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याने (IMD) विजांच्या कडकडाटासह येथे 115.6 ते 204.4 मि मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्रिपुरा, राजस्थान, मेघालय, नागालँड मिझोराम आणि मणिपूरमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महायुतीला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केली स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या घोषणा

तसेच पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत अतिवृष्टी तर पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 21 ते 24 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. केंद्र सरकारकडून हिमाचल प्रदेशमध्ये मदतीसाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे.

Animal Husbandry Business : ‘ही’ गाई देते 800 लिटर दूध, जाणून घ्या नेमकी काय आहे खासियत?

Spread the love
Exit mobile version