शाळकरी मुलीच ‘ते’ प्रेमपत्र सोशल मीडियावर व्हायरल; मुलगी लिहिते की, “मी तुला नाही म्हणाले पण…”

It's schoolgirls 'te' love letter viral on social media; The girl writes, "I told you no but..."

प्रेमी युगुलांची पत्रे हा लोकांसाठी गंमतीचा विषय असतो. पूर्वीच्या काळी प्रेमात असलेल्या व्यक्ती एकमेकांना पत्र पाठवायच्या मात्र आता काळाच्या ओघात हे कमी झाले आहे. असो काळ बदलतो तशी माध्यमे सुद्धा बदलतात. आता इंटरनेटचा जमाना आहे. या जमान्यात पत्र लिहिणे फार दुर्मिळ आहे. परंतु, जुन्या पत्रांची क्रेझ ( Old love letters) आजही आहे. आजसुद्धा लोक अमृता प्रितमने ( Amruta Pritam) इमरोज ला लिहिलेली पत्रे आवडीने वाचतात. अन् अशातच सोशल मीडियावर सुद्धा खूप दिवसांपासून एक प्रेमपत्र व्हायरल होत आहे.

बिग ब्रेकिंग! सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका

हे व्हायरल ( Viral love letter) झालेलं पत्र भलतंच मजेशीर आहे. एका लहान शाळकरी मुलीने आपल्या प्रियकराला लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रातला मजकूर वाचून अगदी कोणालाही खळखळून हसू येईल. पूनम नावाच्या एका मुलीने हे पत्र लिहिले असून सागर नावाच्या एका मुलाची ती समजूत काढत आहे.

चिंचवडमध्ये पराभव होताच नाना काटेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या प्रमाणावर पैशांचा…”

यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘ प्रिय सागर मी तुला नाही म्हणाले याचा तुला राग आला असेल. यासाठी मी तुझी माफी मागते. पण शाळेतील कोणालाच आपल्याबद्दल काही सांगू नको. सगळ्या मुलांना सांग की माझं आणि तुझं काही नाही.’ यामध्ये पूनमने सागरसाठी हिंदीमध्ये एक कविता लिहिली आहे. ज्यामध्ये ती म्हणते, सागर तू माझं प्रेम आहेस.

बिग ब्रेकिंग! चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय; भाजपची भावनिक चाल यशस्वी

याशिवाय या पत्रात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे या पत्राच्या शेवटी ‘सागर 143 पूनम’ असे लिहिले आहे. काही वर्षांपूर्वी एखाद्याला ‘I Love You ‘ असे म्हणण्यासाठी 143 ही कोड भाषा वापरली जात होती. यामध्ये पूनमने सुद्धा कोड्यात आपले सागरवरील प्रेम व्यक्त केले आहे.

कसब्यात जिंकले रवींद्र धंगेकर मात्र सोशल मीडियावर चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *