बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या रविनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram account) एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बच्चू कडू यांचा दिलदारपणा; दिव्यांग मुलांच्या मदतीला आले धावून
रविना टंडन इन्स्टा रील्सच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या देखील तिने असाच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे मनोरंजन झाले नसून चाहत्यांना धक्का बसला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रविना टंडन तिच्या बाल्कनीची सफाई कराताना दिसत आहे. यामध्ये रविना फुल मेकअप करून फरशी पुसत असल्याचं दिसत आहे. यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकळे
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या कमेंट देखील करत आहेत . या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की Good job. त्याचबरोबर काही युजर यावर हसणाऱ्या इमोजीच्या कमेंट करत आहेत.