मुंबई : भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं एक वेगळच स्थान निर्माण केलं आहे. ते लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान, सोनाली कुलकर्णी आणि भरत जाधव यांचा ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हा चित्रपट खूप गाजला होता. बरोबर १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर भरत जाधव यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिलाय.
या गावात चक्क 1000 वर्षांपासून केली जाते मांजरांची पुजा, कारण ऐकून होताल आश्चर्यचकित
भरत जाधव यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “१५ वर्षांपूर्वी जेंव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा घोटाळे च्या लुकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की नंतर या पात्राला इतकं अमाप प्रेम मिळेल. युट्यूब वर कमेंट्स मध्ये घोटाळे या पात्रासाठी लोकं भरभरून कमेंट करतात , घोटाळेच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोकं तितकंच एन्जॉय करतात याचं कलाकार म्हणून विलक्षण समाधान वाटतं…!! या यशाचं सार श्रेय संपूर्ण टीमच आणि लेखक दिग्दर्शक केदार शिंदेंच”.
Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क बनला परफ्यूम सेल्समन
पुढे त्यांनी लिहिले की, “१५ वर्ष झाली…. आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या…भकासपूर वाट पाहतोय” सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकरी या पोस्टवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Marigold: झेंडूने खुलविले शेतकऱ्याचे जीवन, रोज मिळतोय ‘एवढा’ पैसा