Jaipur News । सध्या जयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपुर या ठिकाणी तरुणीचा कारणे चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास नाईट क्लबच्या बाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाईट क्लबच्या बाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान चालकाने कारसमोर उभा असलेल्या दोघांना उडवलं.
हा सर्व प्रकार नाईट क्लबच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांना कारने चिरडल्यानंतर चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र या घटनेमध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण जखमी झाला आहे. मृत्यू झालेली तरुणी ही मूळची मध्य प्रदेशची असून ती जयपूर मध्ये राहत होती.
मृत झालेली तरुणी ही इव्हेंट मॅनेजमेंट चे काम करत असून मंगळवारी रात्री ती आपल्या मित्रांसह नाईट क्लबमधून बाहेर आली असता हा वाद झाला. कारच्या बाहेर उभे राहून हे दोघे एकमेकांना भांडत होते. यावेळी कारमध्ये बसलेले दांपत्यातून निघण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कार समोर उभा असल्याने चालक गाडी थांबेल असं वाटत होतं. मात्र कारचालक वेगाने त्यांच्या दिशेने कार घेऊन आला आणि तरुणाला उडवलं त्याचबरोबर तरुणी देखील कारच्याखाली आली आणि तिचा मृत्यू झाला.
This incident happened yesterday at most prominent area of Jaipur – Malviya Nagar
— STAR Boy TARUN (@Starboy2079) December 27, 2023
Girl is dead and boy is injured
Murderer Mangesh Arora is absconding
Ashok Gehlot left Rajasthan in very bad condition. New govt has to act fast to fix law and order@BhajanlalBjp@KumariDiya pic.twitter.com/0dLdWppB6I