Jalna Accident । जालन्यातील वडीगोद्री रोडवर शहापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला समोरासमोर धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही वाहनं चक्काचूर झाली आहेत, आणि त्यामध्ये अनेक जखमींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, अपघाताचा आवाज इतका जोरदार होता की, आसपासच्या लोकांनी धाव घेतली. या अपघातामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, कारण काही जखमींची स्थिती चिंताजनक आहे.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषणाच्या चौथा दिवशी मोठी माहिती समोर
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाली नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. जखमींच्या काळजीची पाहणी करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
Ajit Pawar Facebook Hack । धक्कादायक! अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक; फेक न्यूज पसरवण्याचा प्रयत्न
स्थानीय प्रशासनाने या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू केला आहे आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. जनतेने सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद केले गेले.