आई श्रीदेवीच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्यू २१फेबुवारी २०१८ साली झाला आहे. श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. श्रीदेवी गेली कित्येक दिवस आपल्यात नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या भुमिका आजही चाहते विसरू शकेल नाही. आज चाहते श्रीदेवी यांच्या आठवण करून सोशल मीडियावर (Social Media)त्यांचे फोटो शेअर करत आहेत. यादरम्यान श्रीदेवी यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) आईला विषयी एक भावूक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
बहुचर्चित ‘रौंदळ’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहीले की, मी आजही प्रत्येक ठिकाणी तुला बघते आहे, मी आजवर जे करत आहे मला अशा आहे की हे बघुन तुला अभिमान वाटेल. मी आज कुठे ही गेली आणि काहीही केले त्याची सुरुवात आणि शेवट हा तुझ्यापासून होतो. तसेच तिने आई श्रीदेवी यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कमेंट देखील करत आहेत.
“…त्यामुळे मला ट्रोल करणं थांबवा”; गौतमी पाटीलनं केलं भावनिक आवाहन
दरम्यान, श्रीदेवींचा मृत्यू २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये झाला होता. यावेळी, ती दुबईला एका फॅमिली फंक्शनसाठी गेल्या होत्या, तिथे ती हॉटेलच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. तिला जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ बघायचा होता, पण ते होऊ शकले नाही. जान्हवीला आजही या गोष्टीचा पश्चाताप होतो.