Manoj Jarange Patil । मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळत नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण जाहीर केले असले तरी जरांगे पाटील निराश झाले आहेत. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. (Latest marathi news)
“मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतले टीकणारे आरक्षण पाहिजे होते. पण हे सरकार दहा टक्क्यांचे आरक्षण (Reservation strike) घेऊन मला गप्प करायला पाहत होते, पण मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी, यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवितो”, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.
“सरकारने आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही आता सरकारचा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मुंबईमध्ये 36 आमदार एकत्र बसले आणि तिथे अस ठरलं की याला 10 टक्के आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला गुंतवून टाका. आम्हाला सरकारने गोडी गुलाबीने आरक्षण द्यावे, आमच्या नादी लागू नये. जरी मला जेलमध्ये टाकले तरी मी जेलमध्ये मोर्चा काढील,” असे आव्हान आता जरांगे यांनी दिले आहे.
Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये ऊसतोड मजुराने झाडल्या मुकादमावर गोळ्या, कारण जाणून व्हाल चकित