Manoj Jarange Patil । निवडणुकांना लागणार वेगळं वळण! जरांगे पाटलांनी घेतली मोठी भूमिका

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा समाजाला (Maratha reservation) ओबीसींमधून (OBC) आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाहीत, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकांना वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Lok Sabha Election । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?

काल मध्यरात्री अचानक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भेटीदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पण वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र निवडणूक लढणार का? यावर आंबेडकर यांनी योग्य वेळ आली की सांगू असं म्हटलं आहे.

Sampada Patil । निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नाराजी भोवणार! ‘हा’ बडा नेता हाती घेणार मशाल

समाज जर म्हणाला तर इतक्या ताकदीनं राजकारणात उतरणार, त्यावेळी मला हलक्यात घेऊ नका. येत्या तीस तारखेला आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. पण जरांगे पाटील आणि आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Bjp । ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Spread the love