Jarange Patil । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण; जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा

Manoj Jarange

Jarange Patil । नुकत्याच राज्य सरकारने (State Govt) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र सध्या पुन्हा एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी जर कायद्याची अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसात झाली नाही तर मी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Budget Session । मोठी बातमी! अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मोदी सरकार घेणार सर्वात मोठा निर्णय

९ तारखेपर्यंत सरकारची डेडलाईन आहे. ९ तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे पंधरा दिवस पूर्ण होत असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील हे रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली आहे.

Rishabh Pant । भीषण अपघातावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; म्हणाला, “मला वाटले की या जगात माझा वेळ संपला…”

महाराष्ट्र सरकारने सगेसोयऱ्याबाबत अध्यादेश काढला आहे. त्याचं १५ दिवसातच विशेष अधिवेशन बोलवून तातडीने कायद्यात रूपांतर करावं. जर तातडीने अंमलबजावणी केली नाही तर 10 फेब्रुवारी पासून कठोर उपोषण करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Kerala News । ब्रेकिंग न्यूज! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी १५ जणांना फाशी, कुटुंबासमोरच केली होती हत्या

Spread the love