
Maratha Reservation । पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation Protest) अजूनही कोणताच तोडगा निघाला नाही. राज्य सरकारकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या, त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
मनोज जरांगे पाटील हे आजपासून पाणी आणि औषध त्यागणार आहेत. त्यांच्या उपोषणाला आज 13 वा दिवस झाले तरी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळू शकते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईत एक बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत राज्यातील विरोधी पक्षांचा समावेश असणार आहे.
Sana Khan Murder । सना खान हत्याकांडप्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
या बैठकीत मराठा आरक्षणासह ओबीसींच्या (OBC) भूमिकेवरही चर्चा होईल. परवा झालेल्या सातपैकी एकही निर्णयाचा आदेश निघाला नाही. समित्यांना अहवाल देण्यासाठी एका महिन्याचा अवधी लागेल, असे सांगितले जात आहे. किमान उद्याच्या बैठकीत तरी मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणता तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.